आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navratra Utsav News In Marathi, Mahoorgad, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिशक्ती : माहूरगडावर आजपासून नवरात्रोत्सवास सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - आदिशक्तीच्या साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असलेल्या माहूरगडावर गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. घटस्थापनेनंतर सकाळी ११.३० वाजता आरती होणार आहे.

माहूरगड हे रेणुकामातेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ते अनसूया माता, दत्तप्रभूंसाठीही प्रसिद्ध आहे. दत्तात्रेयाचे जन्मस्थानही याच गडावर आहे. माहूरगडाचे हे धार्मिक महत्त्व असल्याने बाराही महिने गडावर भक्तांची गर्दी असते. नवरात्र उत्सवात मात्र भाविक मोठ्या संख्येने येतात. माहूर येथील सोन्यापीर दर्गाह हा मुस्लिमांसाठी श्रद्धास्थान असल्याने मुस्लिम भाविकही माहूरला नियमित येतात.

माहूरगडावर उत्सवाच्या ९ दिवसांत ५ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे गडावर पिण्‍याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. भाविकांना गडावर काही आरोग्याबाबत तक्रार आली, तर तिचे निवारण करण्यासाठी रुग्णालय सुरू करण्यात आले. एक रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली. गडावर रांगेत असणा-या भाविकांना रेणुकामातेचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर परिसरात जवळपास १० एलसीडी लावण्यात आले. माहूरगडावर रेणुकामातेच्या प्रसादाबरोबरच विशेष तांबूल काउंटर सुरू करण्यात आले. भाविकांच्या सोयीसाठी खबरदारी घेण्यात आल्याची माहिती किनवटचे उपजिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.