ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नक्षल्यांच्या हल्ल्यात उमेश जावळे शहीद
उस्मानाबाद - गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती येथे गुरुवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मूळ मेंढा येथील रहिवासी पोलिस हवालदार उमेश पांडुरंग ऊर्फ बंडू जावळे (28) शहीद झाले. शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील वडासा शीघ्र कृती दलात कार्यरत जावळे गस्त घालत होते. त्या वेळी हल्ला झाला. त्यांच्या उजव्या डोळ्याला गोळी लागल्याने जावळे शहीद झाले. ही माहिती समजताच मेंढा गावावर शोककळा पसरली. दुपारी चारच्या सुमारास हेलिकॉप्टरने जावळे यांचे पार्थिव उस्मानाबाद येथे आणण्यात आले. येथून वाहनाने मेंढा येथे नेण्यात आले. गावात पार्थिव आणल्यानंतर ‘उमेश जावळे अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.