आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Presindet Sharad Pawar To Visit Drought Affected Areas In Marathwada

शरद पवार यांनी दिला \'जेलभरो\'चा इशारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची केली नक्‍कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्‍मानाबाद- ''आज 14 ऑगस्‍ट आहे. येणा-या 14 सप्‍टेंबरपर्यंत शासनाने शेतक-यांच्‍या मागण्‍या पूर्ण कराव्‍या अन्‍यथा जेलभरो आंदोलन करू'', असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पवारांच्या तीन दिवसाच्‍या मराठवाड्यातील दुष्काळ दौ-याला उस्‍मानाबादेतून सुरूवात झाली. यावेळी पवार यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. जेलमध्‍ये जागा पूरणार नाही इतके लोक या आंदोलनात जनावरांसहीत सहभागी होतील असेही पवार यांनी म्हटले.

''आम्ही सत्‍तेत असतांना शेतक-यांचे हित पाहिले. मात्र, भाजप सरकार चाकोरीत काम करत नाही. उस्‍मानाबादमध्‍ये 88 शेतक-यांनी आत्‍महत्‍या केली आहे. शेतक-यांच्या बिकट प्रश्‍नांचे गांभीर्य सरकारला नाही.'' अशीही टीका पवारांनी यावेळी केली.
नरेंद्र मोंदींची केली नक्‍कल
उस्‍मानाबादेतील सभेत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्‍कलही केली. 'उद्या सकाळी ऐका ते कसे ' बहिणो और भाईयो' म्‍हणतात.' अशी मोदींची शैली त्‍यांनी सादर केली. ऐरवी मोदींना बहिण- भाऊ का दिसत नाहीत, असा सवालही उपस्‍थित केला. संसदेच्‍या अधिवेशनात 20 दिवसांत पंतप्रधान सभागृहात आले नाही. त्‍यामुळे हे अधिवेशन वाया गेले आहे, असेही पवार यावेळी म्‍हणाले. पवार या दौऱ्यात उस्मानाबादसह, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पवारांसोबत आहेत. शेतकरी, अधिकारी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी भेटी घेतल्यानंतर दुष्काळ आढावा परिषदेच्‍या माध्यमातून ते संवाद साधणार आहेत. उस्‍मानाबादेत दुपारी दोन वाजता दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 35 वर्षांनी पुन्हा एकदा आंदोलनात सहभागी झाले आहेत. शरद पवारांच्या राजकीय कार्यकाळातील हा दुसरा मोठा मोर्चा मानला जात आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, शरद पवार यांच्या दुष्काळी दौर्‍यांचे फोटो...