आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काग्रेसने २ गड राखले; गेवराई, धारूरात ‘कमळ’ फुलले, माजलगावात जनविकास आघाडीमुळे कमळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले असून बीड व परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काकू-नाना विकास आघाडी व एमआयएमच्या मुसंडीमुळे बीडमध्ये राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे, तर गेवराई व धारूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. माजलगावात शिवसेनला वाऱ्यावर सोडून जनविकास आघाडीशी घरोबा केलेल्या भाजपचे कमळ फुलले आहे.

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत २०११ मध्ये ४५ जागांवर वर्चस्व मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ १९ जागा हाती आल्या आहेत. २६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस घसरली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती न झाल्याने दोन्ही पक्षांना संयुक्तपणे फक्त तीन जागा मिळाल्या, तर सभापती संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीने २०, तर एमआयएमने ०९ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. केवळ १६०० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षाचा निसटता विजय झाला. परळीत २०११ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे केवळ आठ नगरसेवक असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी भाजपचे १४ सदस्य फोडून पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली होती. त्या वेळी भाजपकडे -१७, काँग्रेसकडे ६, अपक्ष एक असे संख्याबळ होते. पाच वर्षे परळीत सामान्य लोकांची कामे करत मूलभूत प्रश्न सोडवल्याने यंदाच्या निवडणुकीत नागरिकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना नाकारले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संख्याबळ १९ ने वाढून ते २७ वर गेले. भाजपला मात्र १३ जागांवर फटका बसल्याने केवळ चार जागा आल्या, तर शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा मिळवली.

गेवराईत पाच वर्षांपूर्वीच्या पालिका निवडणुकीत अॅड. लक्ष्मण पवार यांनी विकास आघाडी स्थापन करत १६ जागा मिळवल्या होत्या, तर राष्ट्रवादीने दोन जागा मिळवल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाजपने १८ जागा मिळवल्या असून राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या विजयासाठी विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी जोर लावूनही राष्ट्रवादीच्या पदरी पराजय आला आहे, तर अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी विकास आघाडी स्थापन करत २० जागा िमळवल्या; परंतु यंदाच्या निवडणुकीत केवळ सहा जागांवर काँग्रेसला यश मिळाले. नगराध्यक्षपदाची संधी मात्र काँग्रेसच्या हाती आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाच वर्षांच्या तुलनेत यंदा नऊ जागांनी वाढले असून ही संख्या १६ वर गेली, तर भाजपला सात जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व काँग्रेससाठी चिंताजनक ठरले आहे.

पुढे वाचा... सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
बातम्या आणखी आहेत...