आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या भूकंपात अडकलेली १३ व्यापारी जाेडपी सुखरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - नेपाळमध्ये पर्यटनासह अभ्यास दाैऱ्यासाठी गेलेले शनिवारच्या भूकंपात अडकलेले बीड परभणी जिल्ह्यातील १३ कृषी व्यापारी सुखरूप असून दाेन-तीन दिवसांत ते मायदेशी परतणार अाहेत.
अकाेला येथील निर्माण फर्टिलायझर कंपनीच्या वतीने अायाेजित नेपाळ दाैऱ्यावर बीड परभणी जिल्ह्यातील १३ कृषी व्यापारी पत्नींसमवेत गेले हाेते. शनिवारी ते पाेखरा येथून काठमांडूकडे जात असताना भूकंप झाला. भूकंपाचे वृत्त कळल्यानंतर कंपनीचे माजलगाव येथील विक्री अधिकारी अरविंद देशमुख यांनी शनिवारी दुपारी तत्काळ संपर्क केला असता सुखरूप असल्याची माहिती मिळाली. नंतर रात्री साडेअाठ वाजता पुन्हा सुनील देशपांडे प्रमाेद मुळे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली. सर्व जण सध्या काठमांडू येथील हाॅटेल वैशालीच्या परिसरात असल्याचे देशमुख यांनी "दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.

नेपाळ दाैऱ्यावर निर्माण कंपनीचे बीड, लातूर परभणी जिल्ह्याचे एरिया मॅनेजर सुनील देशपांडे यांच्यासह कुप्पा येथील जगन्नाथ सावंत, तेलगावचे झंवर, टाकरवण येथील प्रमाेद मुळे, वडवणीचे अाजबे, धारूरचे ताेष्णीवाल, जाधव तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे भंडारी, राठी, पुजारी साेनपेठचे पम्पटवार, उबाळे, पवार, घाेडके अादी १३ जण सपत्नीक गेले अाहेत.

लातूरचे दोन डॉक्टर सुखरूप
लातूर- दोनबालरोगतज्ज्ञ वैद्यकीय परिषदेसाठी नेपाळला गेले होते. प्रलयंकारी भूकंपातून ते बालंबाल बचावले असून रविवारी दुपारी ते काठमांडूवरून विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत. डॉ. संदिपान साबदे आणि डॉ. दत्तात्र्य गोजमगुंडे हे लातूरचे दोन बालरोगतज्ज्ञ तीन दिवसांपूर्वी काठमांडूला गेले होते. वैद्यकीय परिषद सुरू असतानाच शनिवारी तेथे भूकंप झाला. मात्र, त्यातून दोन्ही डॉक्टर बचावले. भूकंपानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ते सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारी दुपारी भारत सरकारच्या विशेष विमानाने ते काठमांडूतून रवाना झाले. रात्री दिल्लीतून ते विमानाने पुण्याकडे निघणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी याला दुजोरा दिला असून आणखी कुणाचे नातेवाइक तेथे अडकले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.