आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या मूर्तींचे विसर्जन नाही, "दिव्य मराठी’ची मोहीम, उस्मानाबादेत मंडळांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- दै. "दिव्य मराठी'च्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि विसर्जन मोहिमेला राज्यभर प्रतिसाद मिळत आहे. रविवारी गणरायाला निरोप दिला जात असताना उस्मानाबादकरांनी नवा वस्तुपाठ घालून दिला. "दिव्य मराठी’ने विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना, जलप्रदूषणावर प्रकाशझोत टाकल्यानंतर उस्मानाबादेतील ३० गणेश मंडळांनी यापुढे मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मूर्ती पालिकेकडे ठेवल्या जातील. दै. ‘दिव्य मराठी’च्या ‘मी बनवणार माझा बाप्पा’ या मोहिमेंतर्गत १७,८०० शाडूच्या मूर्तींची स्थापना झाली होती.
उस्मानाबादेत पालिकेच्या विहिरीत विसर्जन व्हायचे. दुसऱ्या वर्षी हा गाळ काढताना भंगलेल्या शेकडो मूर्ती बाहेर येत होत्या. अर्धवट फुटलेल्या या मूर्ती असत. ही विटंबना टाळण्यासाठी "दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला. चार दिवसांपासून या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली होती.