आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Appद्वारे पोलिस "तुमच्या दारी', तक्रार करताच अर्ध्या तासात मिळणार मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - पोलिसांची मदत हवी? संबंधित पोलिस कर्मचारी तुम्हाला मदत करत नाहीत? तर करा प्रतिसाद अॅपवर तक्रार. अर्ध्या तासात तक्रार दाखल होताच प्रतिसाद म्हणून संबंधित कर्मचारी तुमच्याकडे येऊन तुमच्या तक्रारीचे निरसन करून तुम्हाला मदत करणार आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला अर्ध्या तासात त्या अॅपवर त्या संबंधित कर्मचाऱ्याने काय मदत केली याचा फीडबॅक नियंत्रण कक्षाला द्यायचा आहे. पोलिस प्रशासन अधिक गतिमान व्हावे म्हणून ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी या अॅपची माहिती पोलिस प्रशासनाला दिली आहे.
दिवसेंदिवस बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता पोलिस प्रशासन अपडेट होत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानात मदतही आधुनिक मिळावी म्हणून पोलिस प्रशासनाने "प्रतिसाद' अॅप लाँच केले आहे. हे अॅप अँड्राॅइड मोबाइलवर डाऊनलोड करून पाहिजे ती मदत तुम्ही मिळवू शकता. ही अॅप प्रणाली जीपीएस सिस्टिमशी कार्यान्वित असून संबंधित इन्चार्जसह एसपी नियंत्रण कक्षाशी ही यंत्रणा जोडलेली आहे. शालेय विद्यार्थी असो की संकटात सापडलेला एखादा माणूस असो, सर्वांनाच या अॅपचा फायदा होणार आहे.
पोलिस प्रशासन आणखी होणार गतिमान
पूर्वी पोलिस प्रशासनाने वुमेन सेफ्टी अॅप लाँच केले होते. तसेच व्हाॅट्सअॅप, पोलिस नावाचे फेसबुक पेज व आता "प्रतिसाद' अॅप. पोलिस टि्वटरचाही वापर करणार आहेत. "प्रतिसाद' अॅप सर्वांसाठी आणि पोलिस प्रशासनाला गतिमान बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
असे करा डाऊनलोड
अँड्राॅइड मोबाइलधारकाने "प्रतिसाद' असा इंग्रजी व मराठी शब्द टाइप करून अॅप डाऊनलोड करावे. त्यात दिलेल्या फॉरमॅटनुसार तुमचे नाव, मोबाइल नंबर टाकावा. तुम्हाला काय तक्रार करायची ती टाइप करा. हा मेसेज औरंगाबाद नियंत्रण कक्षाला मिळेल. लगेच त्या भागात पोलिस कर्मचारी कोण आहे, त्यांच्या नंबरवर किंवा यंत्रणेशी जोडलेला असेल, तर त्यावरही मेसेज, काॅल जाईल. काही मिनिटांतच पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील.
निपटाराही होणार
प्रतिसाद अॅप राज्य पोलिस प्रशासनाने सुरू केले. हा अॅप जीपीएसशी कनेक्ट असून बीट अंमलदारासह नियंत्रण कक्षाशी कनेक्ट आहे. मदत मागितली त्या व्यक्तीच्या तक्रारीचे पुढे काय झाले. तसेच निपटारा अर्ध्या तासातच होणार आहे.
शंकरराव शिंदे, सपोनि, अजिंठा
बातम्या आणखी आहेत...