आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्ह्यात नवविवाहितेला जाळून मारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- कंधार तालुक्यातील आनंदवाडी येथे नवविवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी पती, सासू व सासरे यांना कंधार पोलिसांनी अटक केली. आनंदवाडी येथील अंगद नारायण केंद्रे (25) याचा विवाह नागदरवाडी येथील आशा (22) हिच्याशी फेब्रुवारी 2012 मध्ये झाला. आशाबाईला वडील नाहीत आणि आईने दुसरे लग्न केले. तथापि वडिलांनी दोन एकर जमीन तिच्या नावावर करून ठेवली. लग्नानंतर ही जमीन नावावर करून दे, असा आग्रह पती अंगद नारायण केंद्रे, सासरे नारायण दौलता केंद्रे, सासू प्रभावती नारायण केंद्रे (रा. आनंदवाडी) यांनी धरला. जमिनीसोबतच किराणा दुकान टाकण्यासाठी एक लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. या कारणावरून आशाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. 10 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमाराला याच कारणावरून पती, सासू व सासरे यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. गंभीर अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ती रविवारी दगावली.