आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात सुरू होणार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जालना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विभागांसाठी पात्र डॉक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे संबंधित प्रमाणपत्रे कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (मुंबई) येथे पडताळणीसाठी पाठवली आहेत. तेथून डॉक्टरांची नावे अंतिम होऊन आल्यावर अभ्यासक्रम सुरू होतील. यात वर्षे अभ्यासक्रम त्यानंतर वर्षे शासकीय रुग्णालयात सेवा करण्याचा करार केला जाणार असल्यामुळे हे डॉक्टर वर्षे रुग्णसेवा देतील. यामुळे तज्ज्ञांची रिक्त पदेसुद्धा भरण्यास मदत होणार आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाने २९ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक (जिल्हा सामान्य रुग्णालय), वैद्यकीय अधीक्षक (सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, मनोरुग्णालय ई.एस.वाय.एस. हॉस्पिटल) यांना पत्र देऊन पात्रताधारक इच्छुक डॉक्टरांची नावे मागवली होती. यात ते जानेवारी २०१६ दरम्यान सकाळी १०.३० ते सायंकाळी वाजेपर्यंत कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (मुंबई) येथे प्रत्यक्ष हजर राहून सर्व शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्रांच्या मूळ छायांकित प्रती, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने अनुभव प्रमाणपत्र यांची पडताळणी करून घेण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना संबंधित पात्रताधारकांना द्याव्यात, असेही संचालनालयाने म्हटले होते. त्यानुसार राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्या-त्या जिल्ह्यातील पात्रताधारक डॉक्टरांना शैक्षणिक कागदपत्रे संबंधित प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पाठवली होती. यातील २७ जिल्हा रुग्णालयांत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पात्रताधारक डॉक्टरांची (प्राध्यापक) नावे अंतिम करण्यात आली आहेत. त्यामुळे फेब्रुवारीपासून या रुग्णालयात अभ्यासक्रम सुरू होत आहे. दरम्यान, जालना येथील डॉक्टरांची अंतिम निवड यादी मंजूर होऊन येताच अभ्यासक्रम सुरू होऊ शकतील.

राज्यात२५० उमेदवारांना लाभ : अनेकडॉक्टरांनी एमबीबीएस पदवी घेतली, मात्र काही कारणांमुळे पदव्युत्तर पदविका घेण्याचे राहून गेले आहे. तसेच नव्यानेच पदवी घेतलेले पदव्युत्तर पदविका घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. राज्यातील २०० ते २५० उमेदवार पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहे. दर सहा महिन्यांनी सीईटीद्वारे हे उमेदवार निवडले जाणार आहेत. यात शासकीय सेवेतील डॉक्टरांसाठी ४० टक्के, तर खुल्या गटासाठी ६० टक्के जागा राखीव असणार आहेत.

विशेषज्ञ मिळणार
पदव्युत्तरपदविका अभ्यासक्रम वर्षांचा असून हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या उमेदवाराला वर्षे शासकीय रुग्णालयात सेवा करणे बंधनकारक असणार आहे. तसा करारच आरोग्य सेवा संचालनालय करून घेणार आहे. त्यामुळे वर्षे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.

पदविका अभ्यासक्रम
डिप्लोमाइन ऑप्थॅल्मिक मेडिसिन अँड सर्जरी, डिप्लोमा इन गायनॉकॉलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स, डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ, डिप्लोमा इन पॅथॉलॉजी अँड बॅक्टेरिऑलॉजी, डिप्लोमा इन अॅनेस्थेशिया, डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल मेडिसिन, डिप्लोमा इन ट्युबरकुलॉसिस डिसिज, डिप्लोमा इन ट्रान्सफ्युजन मेडिसिन, डिप्लोमा इन ट्रॉपिकल मेडिसिन अँड हेल्थ असे हे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक पदविका अभ्यासक्रमाच्या युनिटसाठी विषयवार दोन प्राध्यापक असणे गरजेचे आहे. यात एक विभागप्रमुख एक सहायक प्राध्यापक राहील.

तज्ज्ञ होण्याची संधी
जिल्हारुग्णालयमहिला रुग्णालयातच तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाने उचललेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून तज्ज्ञ हाेण्याची संधी जिल्हास्तरावर उपलब्ध होत आहे. हे अभ्यासक्रम शिकताना करारादरम्यान तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना सेवा देणार असल्यामुळे तज्ज्ञांची रिक्त पदेही भरली जातील. डॉ. सतीश गोयल, संचालक,फिजिशियन अँड सर्जन (मुंबई)

कागदपत्रे पाठवली
बालरोग,भूलकिंवा बधिरीकरण, नेत्ररोग विकृतीशास्त्र या चार विषयांतील तज्ज्ञ डाॅक्टरांची शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (मुंबई) येथे पडताळणीसाठी पाठवली आहेत. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पात्र डॉक्टर अर्थात प्राध्यापकांची नावे येताच अभ्यासक्रम सुरू केले जातील. डॉ. एम. के. राठोड, अतिरिक्तजिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना