आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीटंचाईचा बळी : विहिरीत पडल्याने नुकतेच लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - पाणी भरताना पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुणाचा साठेवाडी येथे मृत्यू झाला. रणजित रोहिदास धोत्रे (22) असे मृताचे नाव असून, 15 दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते.

देवपिंपरी येथे भागवत मंचरे या शालेय विद्यार्थ्याचा शुक्रवारी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. साठेवाडीत सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना शिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागते. रविवारी सकाळी रणजित पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला होता. पाणी शेंदताना पाय घसरून तो विहिरीत पडला. महिलांनी आरडाओरड केल्यानंतर त्याचा भाऊ महादेवने विहिरीत उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

(संग्रहित छायाचित्र )