आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोरकीनच्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोरकीन- येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूलमध्ये दरवर्षी दहावीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे आसपासच्या गावपरिसरातील विद्यार्थ्यांना ते ये-जा करण्यास सोपे पडत होते, पण आता या ठिकाणचे दहावीचे परीक्षा केंद्रच (क्र. १५२०) बंद केले. त्यामुळे आता धुपखेडा, ढोरकीनसह अन्य ठिकाणच्या शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना लोहगाव, तर काहींना बिडकीनच्या केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा काळात ये-जा करणे चांगलेच अवघड होणार आहे. दोन्ही केंद्रे किमान १० ते १५ किमी अंतरावर आहेत. त्यासाठी ढोरकीन हे केंद्र दहावीच्या परीक्षांसाठी कायमस्वरूपी राहू द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत आहे.
  
औरंगाबाद-पैठण रस्त्यालगतच ढोरकीन येथे जि. प. प्रशाला हायस्कूल आहे. या प्रशालेत पूर्वी ढोरकीन, ढाकेफळ, दिन्नापूर-धुपखेडा या ठिकाणच्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असत. कारण हे केंद्र रस्त्यालगतच असल्याने विद्यार्थ्यांना ते सोयीस्कर ठरत असे. त्यामुळे पूर्वीपासून आता मार्च २०१६ पर्यंत प्रशालेत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. विशेषत: या केंद्रावर मागील दोन-तीन वर्षांत शंभर टक्के कॉपीमुक्ती अभियान राबवण्यात आले, तरीदेखील या शाळांचा चांगला निकाल लागला; पण संबंधित शिक्षण मंडळाने हे दहावीचे परीक्षा केंद्र फेब्रु.-मार्च २०१७ पासून मंडळाच्या निकषानुसार विद्यार्थी संख्या पूर्ण होत नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निर्णय मागे घ्यावा  
ढोरकीन केंद्र रद्द होऊ नये यासाठी आम्ही शासन दरबारी तत्काळ आवाज उठवणार आहोत. ढोरकीन  केंद्र रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. विभागीय मंडळाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा.
- साईनाथ कासोळे, अध्यक्ष, शालेय समिती
बातम्या आणखी आहेत...