आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या थ्रीडी ‘दृष्टी’वर मायक्रोसॉफ्टचे शिक्कामोर्तब, अवकाश दर्शन सोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शालेय मुलांना अवकाश निरीक्षण दाखवायचे असल्यास इंटरनेट तसेच पुस्तकांतून समजाविण्यात येते. शिवाय पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी तारांगण या ठिकाणी जावे लागते. मात्र, आता कुठे जायची गरज नाही. यावर जिल्हा परिषदेचे शिक्षक अनिल सोनुने यांनी पर्याय काढला असून दृष्टी या थ्रीडी व्ह्युअरची (उपकरण) निर्मिती केली आहे. त्यांच्या या संशोधनाचा नुकताच मायक्रोसॉफ्टकडून गौरव करण्यात आला आहे.
आकाशदर्शन करायचे असल्यास मोठ्या प्रमाणात असलेल्या दुर्बिणचा वापर करावा लागतो, तर मुंबई किंवा पुणे येथे असलेल्या नेहरू तारांगण या ठिकाणी जावे लागते. हे सर्वांसाठी शक्य करण्यासाठी अनिल सोनुने यांनी मायक्रोसॉफ्टच्या वल्डवाइड टेलिस्कोप या सॉफ्टवेअरची मदत घेत ते संगणकात सेव्ह करून घेतले आहे. हे रिअल टाइम सॉफ्टवेअर असल्याने त्यांनी थ्रीडी पद्धतीचे तयार केलेले दृष्टीमुळे अवकाशातील तारांगणसारखी भौगोलिक माहिती प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रत्यय देते. यासाठी मायक्रोसॉफ्ट वल्डवाइड टेलिस्कोप ५.१, मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.१, मायक्रोसॉफ्ट एक्स्प्रेशन इनकोडर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट याचा वापर करून पाहायला मिळते. त्यांचा हा प्रयोग मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून सन्मानित करण्यात आला. अनिल सोनुने यांनी २००९ पासून मुलांसाठी नवोपक्रमास सुरुवात केली. दरम्यान, मराठी भाषेत मुलांसाठी ऑनलाइन स्वरूपात पर्ल प्रोजेक्ट सुरू केला. या माध्यमातून अनेक शिक्षकांना माहिती पुरविली. यामुळे त्यांना पुढे बालजगत या बेबसाइट तयार करण्याला प्रतिसाद मिळाला. या वेबसाइटला ८९ देशांतील जवळपास ५ लाख ४५ हजार ८८६ जणांनी आजपर्यंत भेट दिली आहे. या वेबसाइटने राज्य मराठी विकास संस्थेचे प्रथम पारितोषिक मिळवले. २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आयोजित इनोव्हेटिव्ह इज्युकेशन फोरम साऊथ आफ्रिका यामध्ये सहभाग, मुलांना कायनेक्ट थ्रीडी कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिक्षण देणे अशा विविध प्रकारच्या कृतीबरोबरच त्यांनी नुकतेच दृष्टी या थ्रीडी व्ह्युअरची निर्मिती केली आहे.
दृष्टीचा खर्च
दृष्टी हे वल्डवाइड टेलिस्कोप या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून संगणकावर दिसणाऱ्या अवकाश दर्शनाची प्रत्यक्ष प्रत्यय देते. यामध्ये सात इंच आकाराची थ्रीडी काच असून ए ७ एलसीडी पॅनल नियंत्रण बोर्ड, एचडीएमआय केबल असून प्लास्टिक बॉडीचा वापर केला आहे. यासाठी जवळपास १५ हजारांचा खर्च लागतो.
मुलांसाठी अवकाश दर्शन
^मुलांना अवकाश दर्शन करावयाचे असून त्यासाठी नेहरू तारांगण अशा ठिकाणी किंवा टेलिस्कोप दुर्बिण लागते. हे सर्वांनाच सहजपणे पाहता यावे यासाठी दृष्टी या थ्रीडी व्ह्युअरची निर्मिती केली आहे. याचा शालेय मुलांना फायदा आहे.
अनिल सोनुने, प्रयोगशील शिक्षक
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...