आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीच्या छेडछाडप्रकरणी एकाला एका वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
हिंगोली  - येथील जैन गल्लीत विद्यार्थिनीच्या छेडछाडप्रकरणी एकाला एका वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. 
 
 खडकपुरा भागात राहणारा सुभाष चिकनकर असे दोषीचे नाव आहे. १ जुलै २०१४ रोजी सदर विद्यार्थिनी रस्त्याने जात असताना सुभाष चिकनकर याने तिची छेड काढली होती. याबाबत येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर प्रकरण न्यायालयात गेले. ४ मे रोजी न्यायाधीश एम. पी. दिवटे यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून १ वर्षाचा सश्रम कारावास आणि ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने गजानन घुगे यांनी बाजू मांडली.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...