आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशांकडून अपशब्द; बार्शीत वकिलांचे ‘काम बंद’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बार्शी - अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी यांनी  वकिलांना उद्देशून अश्लील वक्तव्य केल्याचा अाराेप करत त्यांच्या निषेधार्थ बार असोसिएशनने सोमवारी काम बंद आंदोलन केले. तसेच  त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.    
 
न्यायाधीश प्रतिनिधी हे वकिलांना  अपमानाची वागणूक देतात. उद्धटपणे वक्तव्ये करतात.  चेंबरमध्ये सिगारेट ओढतात, असे आरोप बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल झाल्टे यांनी केले. आठ  जुलै रोजी लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. विधी सेवा प्राधिकरणाने पक्षकारांना पाठवलेल्या नोटिसांत सकाळी साडेदहा ते पाचची वेळ दिली होती. पक्षकारांनी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यास प्रतिसाद दिला. परंतु दुपारी एकच्या सुमारास अचानक लोकन्यायालय बंद झाल्याचे  सांगण्यात आले. यामुळे पक्षकारांनी वकिलांकडे नाराजी व्यक्त केली. दुपारी दोनच्या सुमारास वकील संघाचे पदाधिकारी चर्चेसाठी गेले तेव्हा न्यायाधीश प्रतिनिधी यांनी वकिलांना अपशब्द वापरल्याचा संघटनेचा अाराेप अाहे. दरम्यान, ‘मी प्रसार माध्यमांना काही बाेलणार नाही, माझे वरिष्ठ माहिती देतील,’ असे प्रतिनिधी यांनी शिपायामार्फत माध्यमांना कळवले.
बातम्या आणखी आहेत...