आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या विस्ताराविरोधात लातूरमध्ये कडकडीत बंद, मुंबई-लातूर रेल्वेगाडी बिदरपर्यंत नेल्याने विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरमध्ये रेल्वेच्या विस्ताराविरोधात शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. एरवी गजबजलेल्या गंजगोलाई परिसरातील दुकाने बंद होती, तर रेल्वेसाठीच्या या आंदोलनादरम्यान एकही बस सोडण्यात आली नसल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांना अडकून पडावे लागले.  (छाया : मनोज आखाडे, लातूर)  - Divya Marathi
लातूरमध्ये रेल्वेच्या विस्ताराविरोधात शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. एरवी गजबजलेल्या गंजगोलाई परिसरातील दुकाने बंद होती, तर रेल्वेसाठीच्या या आंदोलनादरम्यान एकही बस सोडण्यात आली नसल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांना अडकून पडावे लागले.  (छाया : मनोज आखाडे, लातूर) 
लातूर - मुंबई-लातूर रेल्वेगाडीचा बिदरपर्यंत विस्तार केल्याच्या विरोधात लातूरमध्ये शुक्रवारी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. लातूरमधील व्यापाऱ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. औषधी दुकाने वगळता दुपारपर्यंत एकही दुकान उघडले नव्हते. आडत बाजार, गंजगोलाई, कापड लाइन, भांडी गल्ली, लोखंड गल्ली या कायम गजबजलेल्या भागात शुक्रवारी शुकशुकाट होता. बंदची अगोदरच कल्पना दिलेली असल्यामुळे ग्रामीण भागातून वैद्यकीय उपचारासाठी आलेल्यांशिवाय इतर कुणीही लातूर शहरात आले नाही. त्याचबरोबर औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, शिवाजी चौक, पीव्हीआर चौक, राजीव गांधी चौक या परिसरातील दुकानेही सायंकाळपर्यंत बंद  होती.  

दरम्यान, रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून दुपारनंतर सुटका केली. सुभाष चौकात पोलिसांनी अशोक गोविंदपूरकर, श्रीकांत रांजणकर, गोपाळ बुरबुरे यांना अटक केली. गूळ मार्केट परिसरात उदय गवारे, मोईज शेख, विक्रांत गोजमगुंडे, दत्ता मस्के, इस्माईल फुलारी, यशपाल गोरे, अंतेश्वर पाटील, बसवंत भरडे, अशोक देडे, खुशालराव सूर्यवंशी यांना तर औसा रोड भागातून प्रशांत पाटील, सोनू डगवाले, मनोज चिखले, अजय पाटील, पवन पाटील, अभिलाष पाटील, संकेत उटगे, माधव गंभीरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदकर्त्यांनी लातूर-मुंबई पुन्हा सुरू करा, विस्तारीकरण रद्द करा, अशा घोषणा दिल्या. आंदोलनात मकरंद सावे, शिवाजी नरहरे, डॉ. हमीद चौधरी, आनंद वैरागे, रणधीर सुरवसे, युनूस मोमीन, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. प्रेमकिशोर तोष्णीवाल, जयप्रकाश दगडे, डॉ. बालाजी सोळुंके, विजय अजनीकर, सुभाष पंचाक्षरी, कैलास खानापुरे, महेश ढवळे सहभागी झाले होते.
 
उस्मानाबाद शहरात केवळ तासभर दुकाने बंद
उस्मानाबाद - मुंबई ते लातूर एक्स्प्रेस रेल्वेची बिदरपर्यंतची फेरी रद्द करावी, या मागणीसाठी करण्यात आलेल्या उस्मानाबाद जिल्हा बंद आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाला. शहरातील काही दुकाने केवळ एक तास बंद ठेवण्यात आली. इतकी यशस्विता वगळता जिल्ह्यात एकाही शहर व गावात आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही.
 
मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वे बिदरपर्यंत न नेता लातूर येथूनच पूर्वीप्रमाणे साेडण्यात यावी, हैदराबाद-अहमदाबाद रेल्वेला उस्मानाबादला थांबा देण्यात यावा, हैदराबाद-पुणे व कोल्हापूर-नागपूर गाडी दररोज नियमित करण्यात यावी, उस्मानाबाद ते पुणे स्वतंत्र इंटरसिटी गाडी सुरू करावी, उस्मानाबादला रेल्वेस्थानकावरील आरक्षण सुविधा सुरू करावी आदी मागण्यांसाठी रेल्वे लोकआंदोलन समिती, उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, रोटरी क्लब, जिल्हा विधिज्ञ मंडळ आदी संघटनांनी शुकवारी (दि. ५) जिल्हा बंद करण्याची हाक दिली होती. मात्र, जिल्ह्यात या आंदोलनाला दांडगा प्रतिसाद मिळाला नाही. व्यापारी महासंघाच्या काही सदस्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली होती. मात्र, त्यांनीही नंतर दुकाने उघडली.
 
पुढील स्लाइडवर वाचा, मनरेगात स्वतंत्र समृद्ध जनकल्याण योजना...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...