आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या महापौरांना झोपडपट्टीधारकांचा घेराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर शहराजवळ असलेल्या नांदगाव वेस भागातील झोपडपट्टीधारकांनी सोमवारी महापौर अख्तर मिस्त्री यांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला आणि तेथेच ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर महापौरांनी सोयी-सुविधा देण्याची हमी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

लातूर शहरातील नांदगाव वेस भागात जुनी झोपडपट्टी आहे. त्या भागात कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. त्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वारंवार देण्यात येते, मात्र त्याची पूर्तता केली जात नाही, असा या झोपडपट्टीतील नागरिकांचा आरोप आहे. विद्रोही ग्रुपचे अतिष चिकटे यांच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्टीधारकांनी सोमवारी सकाळी महापालिका गाठली. त्यानंतर महापौरांना निवेदन देणार असल्याचे सांगत हे नागरिक आणि आंदोलनकर्ते महापौरांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी महापौर अख्तर शेख यांना घेराव घातला.
घोषणाबाजीमुळे दालन दुमदुमून गेले. महापौरांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...