आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभाग ७५ कोटींची अनुदान योजना राबवणार, कृषी आयुक्त विकास देशमुख यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंधळेवाडीत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी डाळिंबाच्या बागेची पाहणी केली. - Divya Marathi
आंधळेवाडीत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी डाळिंबाच्या बागेची पाहणी केली.
आष्टी -जूनच्या सुरुवातीला हजेरी लावून गेलेला पाऊस दोन महिने उलटले तरी परतला नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. २०१३ पासून पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत असल्याने शासन कृषी विभागामार्फत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी रुपयांच्या अनुदानाची योजना राबवली जाणार असल्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आष्टी येथे सांगितले.
तालुक्यातील केरूळ, चिंचाळा येथील पाहणी करताना ते बोलत होते, आयुक्त देशमुख पुढे म्हणाले की, पाऊस पुरेसा न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची हानी झाली आहे. दुबार पेरणीसाठी अद्यापही पाऊस न झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही योजनांची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी २५ कोटी रुपये वैरण विकास प्रकल्पांतर्गत मका, कडवळ बियाणे पुरवण्यात येणार असून प्रोत्साहनपर रक्कमही देण्यात येणार आहे. २५ कोटी रुपये अगोदरच कृषी विभागाने दिले आहे.

मराठवाड्यास जादा निधी
दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती, नियंत्रित शेती आणि शेततळे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरवर्षी ५० हजार शेततळे करण्याची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय पीक विमा व विविध अनुदानित योजनांचा यूपी योजना करण्यात येणार असून मराठवाड्यासाठी खास बाब म्हणून ज्यादा निधी देण्यात येणार असल्याचेही विकास देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...