आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव : मद्यपी मुख्याध्यापकाचा शाळेत धिंगाणा; बीडीओंचा पंचनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
माजलगाव - मद्य प्राशन करून जिल्हा परिषदेच्या शाळेत गोंधळ घालणाऱ्या मुख्याध्यापकास  विद्यार्थ्यांचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी चोप देत कक्षातच स्थानबद्ध करून गटविकास अधिकारी, पंचायत समिती उपसभापतींना फोन केल्याचा प्रकार माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११ वाजता घडला.  गटविकास अधिकारी व उपसभापतींनी या प्रकाराचा पालकांसमोर पंचनामा करून शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.    

तालुक्यातील सिमरी पारगाव  येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. येथे सात शिक्षक कार्यरत असून  १४० विद्यार्थी शिकतात. मुख्याध्यापक यू.आर. धन्वे हे एक वर्षापासून शाळेवर कार्यरत आहेत. एक वर्षापासून ते शाळेत  विद्यार्थ्यांसमोर मद्य  प्राशन करून येत होते. परंतु शिक्षक निमूटपणे हा प्रकार सहन करत होते.  ग्रामस्थांनी अनेक वेळा धन्वे यांना भेटून  शाळेत मद्य प्राशन करून येऊ नका असे  बजावले होते. तरी ते सोमवारी शाळेतच  मद्य प्राशन करून आले होते.
बातम्या आणखी आहेत...