आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई, गेवराईसह 40 क्रीडा संकुलांना 17 कोटींचा निधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विभागीय, जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुले उभारण्यात आली. या क्रीडा संकुलांच्या विकासासाठी २०१६-१७ या वर्षात राज्यातील ४० तालुका क्रीडा संकुलांना १७ कोटी १८ लाख ६१ हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
 
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही उत्तम खेळाडू तयार व्हावे म्हणून क्रीडा संकुल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजघडीला तालुका क्रीडा संकुलासाठी १ कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी ८ कोटी आणि िवभागीय क्रीडा संकुलासाठी २४ कोटींचे अनुदान दिले जाते. नव्याने निधी िवतरीत करण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा संकुलात मराठवाड्यातील गेवराई, अंबाजोगाई, पूर्णा, नायगाव नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेक, हिंगणा, उत्तर नागपूर, कुही इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...