आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू, मात्र मुलाला वाचवण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अंबाजोगाई  - विहिरीत पडलेल्या स्वत:च्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची  घटना अंबाजोगाईतील गुरुवार पेठ भागात घडली. मात्र, मृत्यूपूर्वी स्वत:च्या मुलाला वाचवण्यात या धाडसी वडिलांना यश आले.  
 
अंबाजोगाई येथील गुरुवार पेठेतील रहिवासी आणि वाॅटर प्लँट उद्योगातील तंत्रज्ञ दत्तात्रय पांचाळ (४० ) यांचा मुलगा रोशन (१३) शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास बालाजी मंदिरासमोरील जवळच्या विहिरीत संशयास्पदरीत्या पडला. रोशन विहिरीत पडलेला पाहून दत्तात्रय पांचाळ यांनी पोहता येत नसताना मागचा-पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली आणि बुडणाऱ्या मुलाला कसेबसे काठाकडे ढकलले. मात्र ते स्वत: पाण्यात बुडाले. तोपर्यंत आजूबाजूला बरीच गर्दी जमा झालेली होती. सामाजिक कार्यकर्ते विजय कोंबडे यांनी विहिरीत उडी मारून दत्तात्रय पांचाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. मुलगा रोशन याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत दत्तात्रय पांचाळ हे गुरुवार पेठेतील ललित उपाध्याय यांच्याकडे भाडेकरू होते. मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात सुपरिचित होते. एकीकडे मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत असताना दुसरीकडे त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय पांचाळ यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...