आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात मिठाच्या खड्याचे काम करणारे बाजूला करा, पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- जिल्ह्यात सर्वच समाजातील छोट्या छोट्या जाती गुण्यागोविंदाने राहतात. मात्र काही राजकीय मंडळी मीठाच्या खड्यासारखे काम करतात, परंतु यापुढे याच लहान सहान जातीला सोबत घेऊन जिल्ह्याला नेतृत्व देण्याची मानसिकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वडवणीत रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतर व उद्घाटनप्रसंगी केले, तर आजपर्यंत माझा समाज मला खलनायकाच्या भूमिकेत मला पाहत होता, परंतु मला आज संत भगवानबाबांच्या जयंतीनिमित्त आमंत्रित करण्यात आले हे पाहून मनाला खूप बरे वाटते, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुंडे भावंडे रविवारी वडवणीत आल्याने दोघे एकमेकांबद्दल काय बोलतात याची उत्सुकता जनतेला लागली होती.  

वडवणी शहरातील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारत स्थलांतर व उद््घाटन रविवारी सकाळी साडेअकराला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. पुढे बोलताना  पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही संस्थेपेक्षा रामलिंग पतसंस्थेचे काम देखणे आहे.  वडवणीला भविष्यात कापडाचा ब्रँड तयार करू पण मला आपल्या सहकार्याची गरज आहे. हा जिल्हा अल्पसंख्याकांना राजकारणात स्थान देणारा जिल्हा आहे. केशरकाकू क्षीरसागरांपासून ते रजनीताई पाटलांपर्यंतचा इतिहास आहे. परंतु काही लोक मिठाच्या खड्याचे काम करतात. अशांना राजकारणातून बाजूला केले पाहिजे.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, समाज आज मला नायकाच्या भूमिकेत पाहतोय : धनंजय मुंडे

 
बातम्या आणखी आहेत...