आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाललैंगिक अत्याचाराच्या वर्षात 79 घटना, परिचितांकडून शोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी/ बीड - जनावरांना घेऊन शेतात गेलेल्या बारा वर्षीय मुलीवर साठ वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी दुपारी वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे घडली. सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी नराधम वृद्धाला अटक केली  आहे.  माजलगाव न्यायालयाने या वृद्धाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने बाललैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात तब्बल ७९  बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. परिचितांकडूनच बालकांचे शोषण होत असल्याने पालकांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली अाहे.  

कोठारबन येथील बारा वर्षीय शाळकरी मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत जनावरे घेऊन शेतात गेली असताना लक्ष्मण शामराव मुंडे (६०) याने  तिच्यावर अत्याचार केला. जिल्ह्यात दिवसेंदिवस बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.  जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरात जिल्ह्यात बाललैंगिक अत्याचाराच्या तब्बल ७९ घटना घडल्या आहेत.  त्यामुळे बाललैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

असे प्रकार टाळण्यासाठी पालकांनी, शाळांनी  मुलांना लैंगिक अत्याचाराबाबत सजग करण्याची आवश्यकता आहे.  
 
जिल्हा रुग्णालयात उपचार
पीडित मुलीला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार चाफेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...