आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांनी पाेलिसांचे वाहन उडवले; 12 जखमी, गडचिराेली जिल्ह्यात हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
गडचिराेली - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील भीषण हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी गडचिराेली जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेलाही लक्ष्य केले अाहे. पाेलिसांच्या एका गस्त घालणाऱ्या सुरुंग प्रतिबंधक वाहनाला नक्षल्यांनी भूसुरुंगाद्वारे उडवून दिल्याची घटना बुधवारी गडचिराेली जिल्ह्यातील भामरागडजवळ घडली. 

या हल्ल्यात १२ जवान जखमी झाले अाहेत. नक्षलविराेधी सी-६० या पथकातील जवान एका वाहनातून गस्त घालत असताना सायंकाळच्या सुमारास हा हल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, याच भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक सीअारपीएफ जवान व दाेन पाेलिस जखमी झाल्याचीही माहिती अाहे. 
 
अतिशय दुर्गम भाग असल्याने जखमी जवानांविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.  २५ एप्रिल राेजी सुकमा जिल्ह्यात भीषण हल्ला करुन नक्षलवाद्यांनी २५ जवानांचा बळी घेतला हाेता. त्यापाठाेपाठ
 
 भंडारा जिल्ह्यातही भूसुरुंग पेरुन घातपाता कट रचला हाेता, मात्र पाेलिसांच्या सतर्कतेमुळे ताे यशस्वी हाेऊ शकला नव्हता.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...