आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटनांदूरमध्ये क्लबवर छापा; पोलिसांवर हल्ला, काठी, गजाने मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- तालुक्यातील घाटनांदूर येथील क्लबवर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी छापा मारला. या छाप्यात क्लबचालकाने पोलिस अधिकाऱ्यासह सात पोलिसांना काठी, गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. सातपैकी चार पोलिसांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई उपविभागाचे उपअधीक्षक नीलेश मोरे यांच्या आदेशानुसार, पोलिस उपनिरीक्षक खंडेराव हे पथकातील शंकर गुट्टे, उद्धव सरवदे, दिलीप गिते, बळीराम मुंडले, नरसिंग मदणे, लक्ष्मण अण्णारूपी, विष्णू फड हे पोलिस खासगी वाहनातून (एमएच ४४-२३५९) घाटनांदूरमध्ये सायंकाळी पाच वाजता गेले होते. दरम्यान, क्लबवर छापा मारत असताना पोलिस उपनिरीक्षक खंडेराव यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाण होत असल्याने इतर सात पोलिस क्लबमध्ये गेले. क्लबमधील जुगारींनी अन्य सात जणांना गजाने व काठीने मारहाण केली. या मारहाणीत शंकर गुट्टेसह उद्धव सरवदे, दिलीप गिते, बळीराम मुंडले, वाहनचालक शिवाजी घाडगे हे गंभीर जखमी झाले अाहेत. त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुगार खेळणाऱ्यांत राजकीय मंडळींची संख्या अधिक होती.

दोन तुकड्या तैनात
घाटनांदूरमध्ये पोलिसांच्या पथकावर क्लबमध्ये हल्ला झाल्याची माहिती कळताच
पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी गावात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या पाठवून बंदोबस्त लावला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.