आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती संघटनेचा मोर्चा, कोपर्डी प्रकरणातील अाराेपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात  विलास साठे, गंगाधर भांगे, कुमार गायकवाड आदी सहभागी झाले होते. - Divya Marathi
बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विलास साठे, गंगाधर भांगे, कुमार गायकवाड आदी सहभागी झाले होते.
नांदेड  - कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. महाराष्ट्रातून सामाजिक-राजकीय संघटनांनी या घटनेचा निषेध केला व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी नांदेडमध्ये बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.  

नवा मोंढा मैदानावरून निघालेल्या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह एससी, एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, ओबीसी तसेच शीख, लिंगायत, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध यांच्या हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील विविध संघटना, सामाजिक संघटना, व्यावसायिक संघटना तसेच धार्मिक संघटनाही सहभागी झाल्या होत्या.  
या मोर्चामध्ये कोळी समाज संघटना, द ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेड, भारतीय सेवा संघटना, वसुदेव सेवा संघटना, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मन्नेरवारलू समाज संघटना, जिजाऊ ब्रिगेड, धनगर समाज संघ, आदिवासी एकता परिषद, मी वडार महाराष्ट्राचा, अखिल भारतीय ओबीसी महासंघ, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बॉडी, जमाते इस्लामी हिंद, परीट संघ, कुंभार समाज संघटना, न्हावी समाज संघटना यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.