आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील चाैधरी, करवा फार्माला अाैषध विक्रीस ‘एफडीअाय’ची बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकातील अाैषध विक्रेत्यांच्या संघटनेवर  २० वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता राखणाऱ्या गाेरख चाैधरी यांच्या चाैधरी अंॅड कंपनी अाणि करवा फार्मा या दाेन अाैषध विक्रेत्यांनी जादा नफा कमविण्यासाठी अाैषध कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींशी (एमअार) संगमनत करून कंपनीसह शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. 
याप्रकरणात अन्न व अाैषध प्रशासनाच्या मुंबईतील दक्षता विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्थानिक प्रशासनाने या दाेन्ही विक्रेत्यांना तत्काळ अाैषधे खरेदी-विक्री कायमस्वरूपाची बंद करण्याचे अादेश दिले अाहेत. 

दरम्यान, त्यांना साथ देणाऱ्या पाच एमअारविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहेत.अन्न व अाैषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहायक अायुक्त भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाेळे काॅलनीतील करवा फार्मास्युटिकल्सचे अमर करवा व चाैधरी अंॅड कंपनी यांनी सिप्ला कंपनीकडे माेठ्या प्रमाणात अाैषधांची मागणी नाेंदवली. कंपनीच्याच काही एमअारला हाताशी धरून दाेघांच्या व्यवसायाच्या ठिकाणी बनावट शिक्के, पावत्या तयार करून हाॅस्पिटलसाठी विशेष सूटच्या दरात अाैषधे खरेदी केली. मात्र, या अाैषधांची विक्री बनावट बिलांद्वारे अाणि बनावट विक्रेत्यांना केल्याची माहिती विभागाला प्राप्त झाली हाेती. त्यानुसार दक्षता विभागाने छापा टाकून  सखाेल चाैकशी केली असता चाैधरी व करवा यांनी शासन व सिप्ला कंपनीची लाखाे रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास अाले.  याप्रकरणी ‘एफडीने’ तातडीने दाेघांनाही अाैषधे खरेदी विक्री कायम बंदचे अादेश दिले अाहेत.   
 
एमअार’विराेधातही गुन्हा    
बनावट पावत्या, बाेगस नाेंदणीच्या कामात मदत केल्याप्रकरणी करवा फार्मास्युटिकल्सचे अमर अशाेक करवा, भागीदार अजित ब्रिजलाल करवा, अशाेक ब्रिजलाल करवा, गाेरख सदाशिव चाैधरी, त्यांच्या भागीदार विद्या गाेरख चाैधरी, विरेन गाेरख चाैधरी या सहा जणांसह अाकाश पाटील, स्वप्निल बाेरसे, गणेश मंडलीक, ईश्वर क्षीरसागर, दिनकर व्हडगर या सिप्ला कंपनीच्या एमअारविराेधातही गुन्हा दाखल करण्यात अाल्याची माहिती सहायक अायुक्त भूषण पाटील यांनी दिली.