आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेतील घोटाळा: धस, सोळंके, आडसकर यांच्यासह बडे नेते एसअायटीसमोर हजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा बँक प्रकरणात एसआयटीच्या चौकशीकडे पहिल्या दिवशी पाठ फिरवणाऱ्या काही बड्या नेत्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष धैर्यशील सोळंके, राजाभाऊ मुंडे, भाजप नेते रमेश आडसकर, मेघराज आडसकर यांंच्यासह ३५ जणांनी एसअायटीकडे जबाब नोंदवले होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत नियमबाह्य कर्जवाटपप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल १३१ गुन्ह्यांच्या आढाव्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने तपासावर प्रलंबित तीन प्रकरणे आणि पुरवणी दोषाराेपपत्र होणारे आठ अशा अकरा प्रकरणांमध्ये १०१ जणांना सोमवारी नाेटीस बजावून मंगळवारी एसअायटीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु बीडसह अंबाजोगाई, परळीत मंगळवारी १८ ते २० जणांनी हजेरी लावली होती.

या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे अशी बडी नावे असल्याने खळबळ उडाली होती. चाैकशीला बोलावून एसआयटीकडून अटक होण्याच्या भीतीने अनेक बडे नेते सोमवारपासून अज्ञातवासात गेले होते. मंगळवारी बीड, अंबाजोगाई, परळीत जवळपास वीस जणांनी एसआयटीसमोर हजेरी लावली. त्यांचे जबाब नोंदवून त्यांना सोडून दिल्याने पोलिस अटक करत नाहीत हे पाहून मंगळवारी बडे नेते समोर आले. एसआयटीने त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

यांचे नोंदवले जबाब
बुधवारीदुपारी चार वाजेपर्यंत माजी मंत्री सुरेश धस, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष धैर्यशील सोळंके, माजी अध्यक्ष राजाभाऊ मंुडे, माजी अध्यक्ष अरुण इंगळे, रमेश आडसकर, मेघराज आडसकर, माजी उपाध्यक्ष मधुकर ढाकणे, रामराव आघाव, विजय गंडले, पांडुरंग गाडे, माजी संचालक वसंत सानप, लता सानप, मनोहर डाके, अनिल सोळंके, सुदाम बडे, भागवत पौळ यांच्यासह अन्य काही जणांनी पहिल्यांदाच एसआयटीसमोर हजेरी लावली. माजी संचालक विलास बडगे, दिनकर कदम, मंगला मोरे, बदामराव पंडित यांनी दुसऱ्यांदा हजेरी लावली.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष धैर्यशील सोळंके, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश आडसकर त्यांचे बंधू मेघराज आडसकर हे एसआयटीसमोर हजर झाले. छाया:दीपक जवकर
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...