आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: नगर ते नारायणडाेहपर्यंत पहिल्यांदाच धावले रेल्वे इंजिन !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडा- बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणारा नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग अाहे, ताे कधी पूर्ण हाेताे, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण होत अाहे. नगर ते नारायणडाेह दरम्यान शनिवारी पहिल्याच वेळेस रेल्वे इंजिन धावले. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून धावत्या रेल्वे इंजिनचे फाेटाे मोबाइलमधून काढून सोशल मीडियावर पाठवले जात अाहेत. 

बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर नगर ते नारायणडोह दरम्यान शनिवारी पहिल्यांदाच रेल्वे इंजिन धावले. नगर-दौंड महामार्गावर हा रेल्वेमार्ग महामार्गास छेदतो. तेथून हे रेल्वे इंजिन जाताना रस्त्याने जाणारे वाहन चालक मोठ्या कुतूहलाने या रेल्वे इंजिनाचा प्रवास आपल्या डोळ्यात साठवत अाहेत. 

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामात थेट पंतप्रधान यांनी लक्ष घातल्याने या रेल्वेच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. नगर ते परळी दरम्यानच्या बहुतेक सर्व ठिकाणचे रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाले आहे. भरावांचे काम देखील आटोपत आले आहे, तर नगर ते नारायणडोह या पहिल्या टप्प्यातील पंधरा किलोमीटर कामावर रेल्वे रूळ देखील अंथरूण झाले आहेत. याच रेल्वे मार्गावर शनिवारी पहिल्यांदा रेल्वे इंजिन धावले. नगर ते नारायणडाेह दरम्यान १५ किलाेमीटरच्या अंतरावर रेल्वे विभागाचे काम पूर्ण झाले अाहे. रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात अाल्याची माहिती फाेटाे सोशल मीडियावरून फिरू लागले अाहेत. 

रेल्वेचे काम पाहण्यासाठी नागरिकांची होऊ लागली गर्दी 
नगर-बीड-परळीरेल्वे मार्गाचे काम पूर्ण हाेऊन एकदाची रेल्वे धावेल हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे डाेळे आतूर झालेले अाहेत. राज्य रस्त्यालगत जाणाऱ्या या मार्गाचे काम नागरिकांना सहजपणे दिसून येत असल्याने नागरिकांकडून मोबाइलद्वारे फाेटाे काढून लागलीच साेशल मीडियावर शेअर केले जात अाहेत. विविध साेशल मीडियावर रेल्वे इंजिन धावलेले छायाचित्र पाहिल्यानंतर नगर ते नारायणडाेह दरम्यान रेल्वे चे काम पाहण्यासाठी लोक गर्दी करु लागले अाहेत. 

बीड पर्यंत रेल्वेचे काम जलदगतीने 
नगर-बीड-परळीरेल्वे मार्गाची कामे जलदगतीने सुरू अाहेत. नगर ते नारायणडाेह १५ कि.मी.अंतरापर्यंतचे काम पूर्ण झाले अाहे. बीडच्या दिशेने माती काम पूर्ण झाले असून रूळ टाकण्याच्या प्रक्रियेपर्यंत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...