आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे अामिष दाखवून 8 महिन्यांपासून सतत बलात्कार; नंतर जिवे मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- लग्नाचे अामिष दाखवत माजलगाव शहरात शाहूनगर भागात आठ महिन्यांपासून बलात्कार करून पुन्हा लग्नास नकार देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद माजलगाव तालुक्यातील शुक्लतीर्थ लिंबगाव येथील २२ वर्षीय पीडित युवतीने दिली आहे. त्यानुसार आरोपी पांडुरंग गिन्यानदेव गावडे नारायण अंकुश काळे यांच्या विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

माजलगाव तालुक्यातील शुक्लतीर्थ लिंबगाव येथील २२ वर्षीय युवतीस याच तालुक्यातील खानापूर येथील पांडुरंग गिन्यानदेव गावडे (२६) याने शहरातील शाहूनगर भागातील राजस्थानी शाळेजवळील बबन चव्हाण यांच्या कानिफनाथ अपार्टमेंटमध्ये भाड्याने रूम करून देऊन आॅगस्ट २०१६ ते १६ मार्च १७ पर्यंत लग्नाचे अामिष दाखवत सतत बलात्कार केला सदरील पीडित युवतीने लग्नाची मागणी केली असता तिला नकार दिला. तीन एप्रिल राेजी परभणी टी पाॅइंटवर पांडुरंग गावडे त्यास साह्य करणारा नारायण अंकुश काळे या दोघांनी मिळून पीडित युवतीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित युवतीने माजलगाव शहर ठाण्यात लग्नाचे खोटे आमिष दाखवून सतत आठ महिने बलात्कार केला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी पांडुरंग गिन्यानदेव गावडे (रा. खानापूर) त्यास साह्य करणारा त्याचा साथीदार नारायण अंकुश काळे (रा. डेपेगाव, ता.माजलगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. 
बातम्या आणखी आहेत...