आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज कुंभारी येथे जवान प्रकाश साळवे यांच्यावर अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- भोकरदन तालुक्यातील बीएसएफचे जवान प्रकाश सखाराम साळवे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या मूळ गाव कुंभारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

दरम्यान, भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळसिंग बुंदेले यांनी ही माहिती दिली. कुंभारी येथील जवान प्रकाश साळवे हे जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबादला आणले जाणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी कुंभारी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...