आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रास्ता रोको, झरी, गंगाखेडमध्ये शिवसैनिक उतरले रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणीत झरी, गंगाखेड, सोनपेठ, बोरी, देवगाव फाटा, पालम आदी विविध ठिकाणी झालेल्या रास्ता रोकोमुळे जिल्हाभरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  

नोटाबंदीमुळे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव यंदा मिळू लागला आहे. शासनाने जाहीर केलेल्या शेतीमालाला हमी भावदेखील मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर उपाय म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज आहे. शिवसेनेने संपूर्ण कर्जमाफीवर शासनाकडे पाठपुरावा चालवला असून या मागणीसाठी जिल्हाभरात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. झरी येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...