आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात अवैध टेलिफोन प्रकरण : तिघांना पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
लातूर - लातूरमध्ये अवैध टेलिफोन एक्स्चेंज चालवून आंतरराष्ट्रीय कॉल करणाऱ्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएस व लातूर पोलिसांनी हैदराबादेत दोघांना, तर सोलापूरमधून एकाला अटक केली. मोहंमद अब्दुल फैज मोहंमद इक्बाल (रा. फुलबाग, हैदराबाद), मोहमंद इब्राहीम मोहंमद रशीद (रा. वारीसगुडा, सिकंदराबाद)व सुदामन दगडू घुले (रा. सोलापूर) अशी या तिघांची नावे आहेत.  त्यांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एटीएस व लातूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत शुक्रवारी शहरातील दोन अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा भंडाफोड केला होता. त्यात शंकर बिरादार व रवी साबदे या दोघांना पकडण्यात आले होते. प्रारंभी या दोघांनी आपण सगळे साहित्य ऑनलाइन मागवल्याची बतावणी करीत होते.
 
पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे साहित्य हैदराबादच्या मोहंमद फैज मोहंमद इक्बाल याच्याकडून आणल्याचे कबूल केले. त्यानंतर एटीएसचे एक पथक हैदराबादला रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना पकडून रविवारी लातूरला आणले. चौकशीअंती या दोघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान, रवी व शंकरच्या चौकशीत सोलापूर येथे राहणारा सुदामन दगडू घुले यानेही त्यांना मदत केल्याचे पुढे आले होते. सोलापूरला गेलेल्या पथकाने घुलेला पकडून लातूरला आणले. तो रिलायन्स कंपनीत यापूर्वी कलेक्शन मॅनेजर म्हणून काम करायचा. त्याने सिमकार्ड पुरवण्यासह काही तांत्रिक माहिती रवी आणि शंकर या दोघांना दिल्याचे निष्पन्न झाले.  
 
लातुरातील विद्यार्थ्याचे सिमकार्ड? : बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या रॅकेटमधील आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल सिमकार्डमध्ये एक सिमकार्ड शहरातील सीतारामनगरमधील एका विद्यार्थ्याच्या नावावर असल्याची माहिती पुढे येत अाहे. दरम्यान, लातूरमध्ये धाड टाकून पकडलेले रवी साबदे आणि शंकर बिरादार हे दोघे निव्वळ सांगकामे असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस अधिकारी पोहोचले आहे.
बातम्या आणखी आहेत...