आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीठासीन अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, पालिकेची सभा रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - विविध राजकीय घडमाेडींनी चर्चेत राहिलेल्या येथील नगरपालिकेची  निवडणूक पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जनतेतून निवडून अालेल्या नगराध्यक्षांनी मंगळवारी (१० जानेवारी) बाेलावलेली बैठक खुद्द त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लेखी पत्र देऊन ही सभा पुढे ढकलण्याबाबत कळवले. परिणामी  पालिकेची पहिली सभा रद्द ठरली असून जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार केला. परंतु विराेधी पक्षातील नगरसेवकांनी सभा रद्द न करण्याचा पवित्रा घेत सभागृहातच तळ ठाेकला. असे प्रथमच घडल्याने प्रशासन पेचात पडले तर राजकीय गाेटात खळबळ उडाली.

बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अापले नशीब अाजमावले.  परंतु यात जनतेच्या काैलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १६, काकू-नाना विकास अाघाडीला १९, एमअायएमला नऊ, भारतीय जनता पक्षाला एका तर शिवसेनेला दोन  जागांवर यश मिळाले. तीन अपक्ष  असे एकूण ५० उमेदवार निवडून अाले. त्यानुसार निवडणूक अायाेगाच्या निर्देशांप्रमाणे २५ दिवसांमध्ये पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचा अधिकार  जनतेतून निवडून अालेले नगराध्यक्ष यांना अाहे.  शासनाच्या अध्यादेशानुसार प्रथमच नगराध्यक्षांना पीठासीन अधिकारी हाेण्याचा मान मिळाला. शासनाच्या निर्देशानुसार पुढील प्रक्रियेसाठी बीड नगरपालिकेने  १० जानेवारी २०१७ राेजी पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२. १५ मिनिटांनी  सभेस प्रारंभ हाेणार हाेता.  मात्र त्याअाधीच नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नावे पत्र लिहून सभा पुढे ढकलण्याचे स्पष्ट केले. तर सभास्थळी अालेल्या विराेधी पक्षातील नगरसेवकांनी सभा रद्द न करण्याचा पवित्रा घेतला. पेच निर्माण झाल्यामुळे  जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार केला अाहे. राज्यात बीड नगरपालिकेत असा प्रकार प्रथमच घडला अाहे.