आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसन करणाऱ्यांच्या घरासमोर दवंडी देऊन गाव व्यसनमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - आजच्या युवकांमध्ये तंबाखू, सिगारेट, विडी व गुटखा, मद्य यांचा जास्त प्रमाणात वापर होत आहे. याचे वाईट दुष्परिणाम होऊन पूर्ण कुटुंब विस्कळीत होते. दरम्यान, परतूर तालुक्यातील श्रीधर जवळा येथील ग्रामस्थांनी संघटित होत गाव पाणंदमुक्त केले.

ग्रामस्थांनी एवढ्यावरच न थांबता गाव व्यसनमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी जे ग्रामस्थ व्यसन करतील त्यांच्या घरासमोर जाऊन दवंडी देत आहेत. यासोबतच गावातील दुकानदारही दुकानात मादक द्रव ठेवणार नाहीत, असे बोर्ड लावत असल्यामुळे गाव १०० टक्के व्यसनमुक्त झाले आहे. आजची पिढी ही व्यसनापासून दूर राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अशा युवकांना समज देताना समाजसेवकांना अनेक विरोधांचा सामना करावा लागतो, परंतु ग्रामस्थांमध्ये संघटन असल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचे श्रीधर जवळा येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. गाव पाणंदमुक्त, स्वच्छता, प्रत्येक घरात स्वच्छ पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर, वृक्षांची लागवड, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम नियमित गावात राबविले आहे. गावात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चार महिन्यांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगने युवक नेतृत्व शिबिर, दररोज सकाळी ध्यानाद्वारे गावातील ७० टक्के युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांसाठी नियमित शिबिरे घेऊन ग्रामस्थांना संघटित करण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रा. पुरुषोत्तम वायाळ, परमेश्वर राजबिंडे, राजीव हजारे आदींनी केले. या माध्यमातून पहिल्यांदा गाव तंटामुक्त झाले, यानंतर पाणंदमुक्त, आता हे गाव व्यसनमुक्त झाले आहे, परंतु गाव १०० टक्के व्यसनमुक्त करण्यासाठी जो कोणी गावात व्यसन करताना आढळून आल्यास त्याच्या घरी जाऊनच दवंडी दिली जात आहे. या दवंडीमुळे गावात या कुटुंबाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. यामुळे कोणीच गावात व्यसन करत नाही.
गाव मॉडेल करणार
> तंटामुक्त, पाणंदमुक्त, व्यसनमुक्त या तीनही उपक्रमात ग्रामस्थांनी चांगले काम केले आहे. ग्रामस्थांच्या संघटनातून विकास करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये एकजूट आणणार आहे.
महादेव राजबिंडे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती.
इतर गावांनी आदर्श घ्यावा
> श्रीधर जवळा गावाला भेट दिली आहे. ग्रामस्थांमध्ये संघटन असल्यामुळेच हा सकारात्मक बदल झाला आहे. या गावचा इतर गावांनी आदर्श घेऊन आपले गाव तंटामुक्त करण्याबरोबरच व्यसनमुक्तही करावे.
अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी परतूर.