आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतमाल खरेदीसाठी सरकारचे खासगी बड्या कंपन्यांना आमंत्रण; चंद्रकांत पाटील यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- दोन वर्षांत चांगल्या प्रमाणात झालेला पाऊस आणि तत्पूर्वी गाळ उपसून शेतात टाकल्याने सुपीक जमिनीमुळे शेतीमालाचे सर्वत्रच उत्पन्न वाढले आहे, परंतु हा संपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासगी बड्या कंपन्यांना यासाठी आमंत्रित केले असल्याचे राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. खड्डेमुक्त रस्त्यांच्या आढावा बैठकीसाठी बांधकाममंत्री पाटील हे गुरुवारी (दि.२३) उस्मानाबादेत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.   


रस्त्यावरील खड्ड्यांबाबत बोलताना त्यांनी रस्तेच चांगले बनविले नसल्याने खड्डे पडत असल्याचा टोला आघाडी सरकारला लावला. तसेच खड्डे पडणे हे काही नवीन बाब नाही. मात्र, आता केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात २२ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, साडेसहा हजार किलोमीटरचे सहापदरी रस्ते, भारतमाला योजनेंतर्गत व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून काही असे जवळपास ३८ हजार किलोमीटरचे पक्के रस्ते येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत. या रस्त्यांवर पुढची दहा-बारा वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, असा दर्जा राखण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

 

शेतमाल खरेदीचे मॉडेल  
कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांशी सरकार शेतमाल खरेदीसंदर्भात करार करेल. त्यांना बाजारात उतरुन चांगल्या दराने शेतमाल खरेदी करावयास लावेल. या शेतमालातून  ते जे उत्पादन तयार करतील. त्यातून त्यांना फायदा झाला तर तो त्यांचा आणि नुकसान होत असेल तर त्यांची बॅलन्सशीट पाहून सरकार त्यांना मदतीचा विचार करेल.  लवकरच या मॉडेलचा अवलंब करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे महसूलमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...