आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून चौसाळा येथे तरुणाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौसाळा  - वयोमर्यादा संपल्याने नोकरी मिळत नसल्याने  नैराश्यातून चौसाळा येथील गायत्रीनगर भागातील सखाराम भिकाराम नवसेकर या तरुणाने राहत्या घरात फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.  

सखाराम नवसेकर हा तरुण उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी प्रयत्नशील होता. परंतु वयोमर्यादा ओलांडल्याने तो चिंतेत होता. या निराशेतच त्याने गुरुवारी रात्री घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. चौसाळा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
घराचा दरवाजा काढला : सकाळी खूप वेळ झाला तरी सखाराम झोपेतून उठेना म्हणून कुटुंबातील लोकांनी दरवाजा काढला. त्यानंतर प्रकार कळला.
बातम्या आणखी आहेत...