आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरी : 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
परभणी - पाथरी शहरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर गुंज रस्त्यावर असलेल्या खदानीत खेळण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा खदानीच बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. सहा) उघडकीस आली. अरबाज शेख शब्बीर (१३) व अरबाजखान मुसा (१३) अशी या मुलांची नावे आहेत.  

रविवारची सुटी असल्याने खेळण्यासाठी जातो, असे सांगून पाथरी शहरातील फाक्राबाद मोहल्ल्यातील शेख अरबाज शेख शब्बीर व अरबाजखान मुसा हे दोघे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घराबाहेर पडले. अरबाज शेख हा इयत्ता सातवीत, तर अरबाजखान हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते. दोघेही एकाच मोहल्ल्यातील रहिवासी असल्याने मित्र होते. ते दोघे पाथरीपासून जवळच असलेल्या खदानीवर गेले. ते सायंकाळपर्यंत घरीच पोहोचले नाहीत. त्यामुळे दोघांच्याही घरच्या मंडळींनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. ते दोघे परभणीत सुरू असलेल्या उरुसाला तर गेले नसावेत या शंकेने घरच्या मंडळींनी रविवारी रात्री परभणीत येऊन उरुसात त्यांचा शोध घेतला. या ठिकाणी पोलिसांशी संपर्क साधूनही रात्रभर शोध घेतल्यानंतरही ते दोघे आढळून आले नाहीत. सोमवारी (दि. सहा) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास पाथरी-गुंज रस्त्यालगत असलेल्या खदानीवर काही महिला धुणी धूत असताना त्यांच्यासोबत असलेली मुले पोहण्यासाठी खदानीत उतरली. त्यांच्या पायाला काहीतरी लागल्याचा भास झाला तेव्हा त्यांनी आरडाओरडा केली. पोहण्यात तरबेज असलेल्या युवकांनी खदानीत शोध घेतला असता त्यांना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. युवकांनी पाण्यातून दुसरा मृतदेहही शोधून काढला.
बातम्या आणखी आहेत...