आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगाचा खटला ६ दिवसांत निकाली, कळंब काेर्टात आरोपीला दाेन वर्षे सश्रम कारावास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब- तुळजापूरच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला कळंब न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे अवघ्या सहा दिवसांत या प्रकरणात निकाल देण्यात आला.
   
या विद्यार्थिनी फील्डवर्कसाठी हसेगाव (केज) येथील पर्याय संस्थेत आल्या होत्या. मूळच्या मिझोराम व मणिपुरातील या   विद्यार्थिनी २४ जानेवारी रोजी कळंब येथील शिवाजी चौकात उतरल्या व टमटममध्ये बसल्या. त्यांच्यासमोर संतोष प्रकाश लिके (२१, रा.खेर्डा) हा युवकही बसला. त्याने टमटममध्येच मुलींची छेडछाड सुरू केली. यानंतर या तीन मुली ‘पर्याय’ वर पोहोचल्या. तरीही तो  त्यांचा पाठलाग करत होता. या तिघी  ज्या खोलीत राहत होत्या, त्या खोलीत लिके याने प्रवेश करून ताे बाथरूमच्या दरवाजामागे दडून बसला. तोंड धुण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीशी संतोषने झोंबाझोंबी केली. मदतीस आलेल्या दुसरीच्या डाव्या हाताचा चावा घेतला. फिर्यादीवरून संतोष प्रकाश लिकेविरुद्ध कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून कळंब न्यायालयात खटला चालण्यात आला. न्यायाधीश ए. एस. मुंडे यांनी अारोपीला दोन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...