आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: शेतकरी महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
हिंगोली - तालुक्यातील इंचा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत येथील ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मीना सुरेश चाटसे (३५) असे सदर महिलेचे नाव आहे. 

सदर महिला अल्पभूधारक असल्याने तिचे पती शेतीसोबतच भंगार विक्रीचे काम करतात. त्यांच्या शेतात त्यांनी हरभऱ्याचे पीक जमा करून ठेवले होते. परंतु लागलेल्या आगीत हरभरा जळून खाक झाला. अगोदरच गरिबी व खासगी कर्ज, आता शेतातील पीकही जळून खाक झाल्याने मीना  चाटसे यांनी मुलाबाळांचे कसे होणार या चिंतेतून शुक्रवारी विष प्राशन केले. त्यांना येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...