आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनतेला भाकरीची चिंता, काँग्रेसचे सोनेरी जेवण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जनतेला दोन  वेळच्या भाकरीची चिंता सतावत असताना राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते सोन्याच्या ताटात जेवण करत आहेत. मुळात हे काही नवे चित्र नाही. काँग्रेसजनांनी वर्षानुवर्षे जनतेला उपाशी ठेवत आपण सोन्याच्या ताटात मोत्याचे घास खाल्ले आहेत, असा आरोप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सोमवारी केला. जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ त्यांच्या औसा तालुक्यात सभा आयोजिल्या होत्या. त्यामध्ये ते टाका येथील सभेत बोलत होते.  
निलंगेकर म्हणाले, लातूर, उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे गेल्या काही वर्षांत दुष्काळाने होरपळले आहेत. येथील शेतकरी अद्याप दुष्काळी मानसिकतेच्या बाहेर पडला नाही. अशा परिस्थितीत या भागात आलेल्या नेत्यांनी भान राखणे अपेक्षित असते. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या परंपरांचे पालन करीत सोन्याच्या ताटात जेवण केले. सामान्य लोकांपासून काँग्रेसची संस्कृती किती दूर गेली आहे, याचे हे द्योतक असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. भाजप जिल्हा परिषदेच्या सत्तेवर आल्यास ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण केले जाईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांनी भाजपला निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...