आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदी प्रश्नावर हिंगोली शहरात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - पणन महासंघाच्या वतीने तूर खरेदी करण्यासाठी चालढकल करण्यात येत असल्याच्या कारणावरून येथील मोंढ्यात सोमवारी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
 
येथील मोंढ्यासह जवळा बाजार आणि वसमत येथे बारदाना नसल्याच्या कारणावरून तूर खरेदी गेल्या १० दिवसांपासून बंद आहे. सरकारी हमी भावाप्रमाणे पणन महासंघाच्या वतीने प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपयांमध्ये  तूर खरेदी केली जात आहे. खुल्या बाजारात एवढा भाव मिळत नसल्याने शेतकरी मोंढ्यात तूर विक्रीसाठी गर्दी करीत आहेत. आजघडीला येथील मोंढ्यात २० हजार क्विंटल तूर मोजमापाऐवजी पडून आहे. बारदाना कधी येणार अनिश्चित असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना थोडा धीर आला आहे. आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संतोष बोनढारे, शेख नेहाल, भागोराव राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक, डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पणन महासंघाने येत्या  दोन, तीन दिवसांत तूर खरेदी केली नाही तर जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी  देण्यात आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...