आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक न्यायमंत्री कांबळे म्हणाले, \'ते\' शब्द मागे घेतो, म्हणाले होते, घाबरायला मी ब्राह्मण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - भाजपच्या आणखी एका मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले. विशेष म्हणजे सामाजिक न्यायमंत्र्यांनीच जातीवाचक वक्तव्य केल्याने याबाबत वाद उफाळण्याची शक्यता आहे. आंदोलनांना मी घाबरत नाही. घाबरायला मी काही ब्राह्मण नाही. मी दलित आहे, आंदोलनं केली तर मुस्काट फोडेन असे दिलीप कांबळे म्हणाले. दरम्यान, एका वाहिनीशी बोलताना आपल्याला कोणालाही दुखवायचे नव्हते, मात्र माझ्या शब्दाचा अर्थ वेगळा काढला गेला असे कांबळे म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी बोलताना आता खूप काळजी घेणे गरजेचे असेल असेही ते म्हणाले. 
 
लातुरात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर काही संघटनांनी आंदोलन केले. त्याबाबत बोलताना सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी हे वक्तव्य केले आहे. 
 
काय म्हणाले दिलीप कांबळे..
आंदोलन करायचे तर माझ्या समोर करा, एखाद्याचे मुक्टात फोडीन.. घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...