आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमामालिनी दारू पिते, पण ती आत्महत्या करत नाही; आमदार बच्चू कडूंचे वादग्रस्त वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणतात. मग अनेक राजकारणी व अभिनेत्री हेमामालिनीही दारू पिते, मग त्यांनीही आत्महत्या करायची का, असा सवाल करून आमदार बच्चू कडू म्हणाले, की गडकरी यांनी मुलाच्या लग्नात चार कोटी रुपये खर्च केले, अशी ही पैशाची उधळपट्टी सुरू असून सध्या शेतकऱ्यांवरच टीका करण्यात येते, हे सरकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे केला.  

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या आसूड यात्रेच्या निमित्ताने आमदार कडू नांदेड येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की,  विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. आता तेच सत्तेमध्ये आहेत. तरी शेतकऱ्यांना हमीभाव देऊ शकले नाहीत. या सरकारने शेतकरीविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. यातून शेतकरी देशोधडीला लागत असल्याचे कडू यांनी सांगितले.
  
सरकारचे निर्णय म्हणजे, चोराच्या उलट्या बोंबा असून एकीकडे कापड निर्यातीला परवानगी द्यायची अन् कापूस निर्यातीला बंदी घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला निर्यातबंदी घातल्यास शेतकऱ्यांचे भले कसे होणार, असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज बुलंद करणार असल्याचे सांगितले
 
काय म्हणाले बच्चू कडू.. 
> नारायण राणे म्हणाले होते की शेतकरी आत्महत्या दारु पिल्याने होते. 
> तसे असेल तर 75 टक्के आमदार दारु पितात, खासदार पितात, पत्रकारही पितात ते का आत्महत्या करत नाहीत.  
> हेमामालिनी तर रोज बंपर दारु पिते, मग तिने अजून आत्महत्या का केली नाही. 
> गडकरी म्हणतात लग्नाचा खर्च जास्त झाल्यावर आत्महत्या होते. 
> त्यांच्या मुलाच्या लग्नात 4 कोटी खर्च झाला, त्याचे काय. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...