आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाणे झडतीचे न्यायालयाचे आदेश, खोट्या सह्या करून रक्कम परस्पर काढल्याचा प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - अंबड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेदाराच्या खात्यातील रक्कम एकाने खोट्या सह्या करून परस्पर काढल्याचा प्रकार २००९ मधे घडला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतरही मुद्देमाल व कागदपत्रे न्यायालयात दाखल न केल्याप्रकरणी  अंबड पोलिस ठाण्याची झडती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
२००९ मध्ये जिल्हा बँकेच्या अंबड शाखेतून आरोपी पंडित जगननाथ नरवडनेे सहा विड्रॉल स्लिपवर खोट्या सह्या करून खातेदारची रक्कम काढून घेतली होती. याप्रकरणी सुरेश रामनाथ फोके यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास तत्कालीन फौजदार बलभीम रेपे करीत होते. अारोपीने रक्कम काढण्यासाठी वापरलेल्या खोट्या कागदपत्राच्या मूळ प्रति जप्त करून  महत्त्वावाची कागदपत्रे त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात जमा केली. त्याबाबतची मुदेमाल पावती दोषारोपपत्रासह न्यायालयात दाखल केली. न्यायाल्याने पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना वारंवार आदेश देऊनही ही कागदपत्रे न्यायालयात दाखल केली नाही. गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. के. गावंडे यांनी अंबड पोलिस ठण्याची झडतीचे वाॅरंट काढले अाहे.  
बातम्या आणखी आहेत...