आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आदेशाने सकाळी रुजू, सायंकाळी सेवानिवृत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
तेर - मागील ४० वर्षे ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक असलेल्या रामकृष्ण भोरे यांना संयुक्तिक कारण न देता २०११ मध्ये सेवेतून कमी केले होते. त्यांनी कामगार न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने भोरे यांना मंगळवारी (दि.२०) सकाळी सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्याच दिवशी वयाचे ५८ वर्षे पूर्ण झाल्याने भोरे सेवानिवृत्त झाल्याने सायंकाळी त्यांना निरोप देण्यात आला.  
 
भोरे हे अनेक वर्षांपासून तेर येथील ग्रामपंचायतमध्ये लिपिक पदावर कार्यरत होते. परंतु २०११ मध्ये  त्यांना सेवेतून काढले होते. त्यांनी कामगार न्यायालय, लातूर यांच्याकडे दाद मागितल्यावर ग्रामपंचायत व तक्रारदार यांच्यात तडजोड होऊन कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना एक दिवस कामावर रुजू करून घेण्यात आले. ते ५८ वर्षांचे झाल्यामुळे त्यांना सायंकाळी निरोप देण्यात आला. तडजोडीनुसार ठरलेल्या रकमेचा धनादेशही त्यांना देण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...