आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: पिंपळगाव येथील कृष्णाचा नरबळी!, तांत्रिकासह तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब/ उस्मानाबाद - तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील वर्षाच्या कष्णाच्या खुनाचे गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. कृष्णाचा रुमण्याने डोक्यात घाव घालून खून करण्यात आला होता. हा खून नरबळीचा प्रकार असल्याचे समोर येत असून याप्रकरणी यापूर्वीच एका पुण्याच्या तांत्रिकासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आणखी दोघे अटक झाली असून याबाबत दोन दिवसांमध्ये पोलिसांकडून खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
 
पिंपळगाव डोळा येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा दि.२६ जानेवारी रोजी झेंडावंदनानंतर घरी परतला. त्यानंतर खेळायला जातो म्हणून गेला तो परतलाच नाही. बरीच शोधाशोध झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी दि.२७ जानेवारी रोजी गाव शिवारातील गोवर्धन टेकाळे यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा डोक्यात रुमने मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु, यामागचे कारण काय? आरोपी कोण याबाबत साशंकता कायम होती. दरम्यान कळंबचे पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी सुनील नेवसे यांनी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचे धागेदोरे उलगडत यापूर्वी दि.४ फेब्रुवारी रोजी लखन चुडावकर (पुणे), उत्तम इंगोले , उर्मिला इंगोले यांना अटक केली होती. त्याचवेळी पोलिसांना हे प्रकरण नरबळीचे असण्याचे संशय आला होता. आणि तपासादरम्यान लखन चुडावकर हा तांत्रिक बाबा असल्याचेही समोर येत होते. परंतु, याप्रकरणात आणखीनही आरोपी असल्याचा संशय असल्याने पोलिस त्यांच्या मागावर हाेते. दरम्यान, या संदर्भात दिनांक एप्रिल रोजी पिंपळगाव (डोळा) येथून द्रोपदी पौळ या महिलेस तर दुसऱ्याच दिवशी दि.१० साहेबराव प्रल्हाद इंगोले (५२) या आणखी एका संशयीताला अटक केली असून दोघांना न्यायालयाने दि.१३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. कृष्णाचानरबळी! : मिळालेल्यामाहितीनुसार, कृष्णा या चिमुकल्याचा नरबळी देण्याच्या प्रकरणातून खून करण्यात आल्याचे समोर आले असून यामध्ये त्याच्या नात्यातीलच माणसांचा समावेश आहे. यासाठी पुणे येथील तांत्रिक बाबा चुडवकरची मदत घेण्यात आली असून हा नरबळी नेमका कोणत्या हव्यास्यातून देण्यात आला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...