आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: आमदार रमेश कदमांचा ठाण्यातील मुक्काम वाढला, 24 जुलै पर्यंत पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले आमदार रमेश कदम यांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता बीडच्या न्यायालयात  हजर करण्यात आले. या घोटाळा प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.व्ही.वाघ यांनी कदम यांना २४ जुलै २०१७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीतील कदम यांचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. 

बीड येथील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील तीनशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात  येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा दाखल झालेला असून या  प्रकरणातील आराेपी आमदार रमेश कदम यांना बुधवारी पुण्याच्या सीबीआयने बीडच्या कोर्टासमोर हजर केले होते. न्यायालयाने कदम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सदरील कोठडी संपल्याने शुक्रवारी कदम यांना न्यायालयात हजर केले. सुरुवातीला सीबीआयच्या पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडले.  हे म्हणणे एेकून घेतल्यानंतर कदम यांनी स्वत:च कटघऱ्यात येऊन स्वत:ची बाजू मांडली. २०१२-१५ कालावधीत राज्यात ३९७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, भंडारा येथे गुन्हे दाखल झालेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...