आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाईत सिलिंडरच्या स्फोटात हाॅटेल जळून खाक; पत्रे फाटले, चायनिजचा गाडा, पंखे अस्ताव्यस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई : योगेश्वरी शाळेसमोरील हाॅटेलमध्ये मंगळवारी सकाळी 7 वाजता लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण हाॅटेल जळून राख झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
अंबाजोगाईत अण्णाभाऊ साठे चौकात योगेश्वरी शाळेच्या समोर दशरथ कराड यांचे भक्ती हाॅटेल आहे. आज सकाळी कराड यांनी नित्यनेमाने हाॅटेल उघडले. तेवढ्यात शाॅर्टसर्कीट होऊन आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. अल्पावधीतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या तडाख्यात सापडून सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने हाॅटेलचे पत्रे फाटले, चायनिजचा गाडा, पंखे अस्ताव्यस्त झाले. आगीत हाॅटेलातील सामानासहीत विक्रीसाठी ठेवलेले शालेय वस्तु जळून खाक होत लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 
 
दरम्यान, अग्निशनमन दलाचे सुंदर जोगदंड, उत्तम थिटे, राजू काळे, पप्पू साळवे, अक्षय भुते यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. याकामी त्यांना आजूबाजूच्या लोकांचीही मदत झाली.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा फोटोज्... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...