आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिरात पायऱ्यावरून कोसळल्याने वृद्धेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
तुळजापूर  - येथील तुळजाभवानी मंदिरात पायऱ्यावरून कोसळल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या वेळी मंदिराजवळील रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नसल्याने सुरक्षा रक्षकांनी वृद्धेला अॉटोरिक्षातून रुग्णालयात हलवले. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.  

तुळजाभवानी मंदिरातील कल्लोळ तीर्थाजवळच्या पायऱ्यावरून पार्वती प्रभू गायकवाड (६५, रा. वडगाव लाख, ता. तुळजापूर) या खाली कोसळल्या. या वेळी जवळच असलेल्या मंदिर सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने उचलून बाहेर आणले. परंतु या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अॉटोरिक्षातूनच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बर्वे यांनी त्यांना तपासून  मृत घोषित केले. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार असल्याचे व वृद्धा दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच मृत पावल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यासह देशभरातील कानाकोपऱ्यातून  लाखो भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. परंतु मंदिर संस्थानतर्फे वैद्यकीय सुविधा भाविकांना पुरवण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...