आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे स्टिअरिंग आता मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉररूम’च्या हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून येडशी ते अाैरंगाबाद टप्प्यातील भूसंपादनाच्या कामात बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात संथगतीने सुरू अाहे. परिणामी, यंत्रणा व निधी मंजूर असून कंत्राटदारांना कामे करणे शक्य हाेत नाही. याचबराेबर राज्यातील १३ जिल्ह्यांमधील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्व कामे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वाॅररूम’मध्ये गेली अाहेत. त्यामुळे अाता अधिकाऱ्यांना जाब विचारले जाणार असून प्रलंबित कामांना गती िमळणार हे िनश्चित अाहे.

धुळे-साेलापूर २११ राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या भूसंपादनाच्या कामास प्रारंभ झाला अाहे. धुळे ते येडशी, येडशी ते अाैरंगाबाद व अाैरंगाबाद ते धुळे अशा तीन टप्प्यांत काम हाेणार अाहे. यात उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न गंभीर बनला जात अाहे. परिणामी, अायअारबी कंपनीकडे यंत्रणा उपलब्ध असून भूसंपादनाअभावी कामे करण्यास अडथळे निर्माण हाेत असल्याचे प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी ‘िदव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. त्याचबराेबर राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हाेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामात दिरंगाई हाेत अाहे. केंद्र शासनाला सर्व जिल्ह्यांमधील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कमी कालावधीत भूसंपादन करून मुख्यमंत्री
वाॅररूममध्ये या प्रकल्पांचा समावेश झाल्याचा शासनाने अाठ िडसेंबर २०१५ राेजी अध्यादेश काढला अाहे.
‘वाॅररूम’ म्हणजे...
मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली ‘वाॅररूम’ कार्यरत असते. राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प तसेच केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रकल्पांच्या कामांत राज्याच्या िठकाणी दिरंगाई किंवा िवलंब हाेत असेल तर अशा प्रकल्पांचे ‘वाॅररूम’द्वारे नियंत्रण केले जाते. याद्वारे केंद्र शासन व राज्याचे मुख्यमंत्री थेट संपर्कात असतात, तर मुख्यमंत्री व राज्यातील प्रकल्पाशी संबंधित यंत्रणा कामासंदर्भात फैलावर घेतली जाते.
भूसंपादनाचा प्रश्न
राज्यातील अाैरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नागपूर, नाशिक, रायगड, नगर, पुणे, सातारा, साेलापूर, धुळे, जळगाव िजल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू अाहे, परंतु भूसंपादनाचे काम रखडल्याने काम संथगतीने होत आहे. हे काम आता जलदगतीने हाेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वाॅररूममधून कामांचे नियंत्रण केले जाणार असल्याचे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले अाहे.
१३ जिल्ह्यांत समितीची कामे
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररूमद्वारे गठित संनियंत्रण समितीद्वारे संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्यासाठी िनयाेजन केले जाणार अाहे. यात निवाडा जाहीर करणे, माेबदल्याचे वाटप, संस्थेस ताबा देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणे व महिन्याला कामाच्या अाढाव्यासाठी एक व अावश्यकतेनुसार अधिक बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे प्रगती अहवाल सादर करणे, असेही अध्यादेशात अाहे.
असा अाहे अध्यादेश
‘वाॅररूम’ नियंत्रणाखाली १३ जिल्ह्यांमधील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये समन्वय समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात अाले अाहेत. यात संबंधित जिल्हाधिकारी (अध्यक्ष), जिल्ह्याचे सक्षम प्राधिकारी भूसंपादन (सदस्य सचिव), उपविभागीय अधिकारी (सदस्य), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित प्रकल्प संचालक (सदस्य) हे समितीमध्ये प्रमुख असणार अाहेत, असे शासनाच्या महसूल व वन िवभागाचे कार्यासन अधिकारी अ. रा. रेडेकर यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...